• smartsam 18w

  #कविता @कविता @mirakee_marathi
  #marathiwriters
  @
  @mirakee_marathi
  @mirakee
  @मराठी #काव्य #मराठी_कविता

  Read More

  बालपण परत यावे!

  वाटे कधी जीवास
  बालपण परत यावे!
  शाळेचे दिवस अन्
  मित्र जुने भेटावेत!

  न्हवती माहीत कधी
  व्यर्थ जीवनाची पोकळी!
  प्रेमभावच सर्वत्र सख्या,
  मन निरागस मोकळी!

  व्यर्थ की सार्थ
  आता जीवनाची व्यथा!
  तेच जीवन खर- बालपण
  कळतंय कुठे आता!

  ते मैदान, ते रस्ते
  ती झाड, तो कट्टा!
  कुठे हरवल ते लहानपण
  सुखाचे दिवस ते मित्रा?

  शाळा, ती छडी
  अन् खडबडीत बाक!
  अजून हि आठवते मनी
  येते कानी मित्राची हाक!

  चाराणे, आठ आणे,
  रुपयाच्या त्या चिंचा!
  न्हवत्या माहीत तेंव्हा
  अकस्मिक ह्या चिंता!

  आठवणीचे परत मित्रा
  धागे दोरे सुटावे!
  दिवस शाळेचे यावे अन्
  मित्र जुने भेटावे!
  दिवस शाळेचे यावे
  मित्र जुने भेटावे!

  वाटे कधी जीवास
  बालपण परत यावे!
  बालपण परत यावे!

  ©SmartSam