Grid View
List View
Reposts
 • sagar_09 6w

  शंभूराजे !

  करेल वार छातीवर अशी
  हिंमत इथे कोणात नाही ,
  सुटेल धर्म माझा कसा
  तो कुण्या एकात नाही !

  स्वाभिमानी हे कातडं माझे
  कसे परके होईल मातीपासून ,
  सहजासहजी सुटेल अशी
  सापाची ती काही कात नाही !

  दळूनी जातो रक्त जात्यावर
  घेऊनी हाती इमानी भाकरी ,
  उष्टेपाष्टे जिरेल कसे हो
  गिधाडापरी आम्ही खात नाही !

  शिवविचारांची तलवार सदा
  मनमंदिरात मी जपली आहे ,
  कसे पेलू शकाल तिला तुम्ही
  सामर्थ्यवान तुमचे हात नाही !

  हो हो केले कैक कावे
  तुम्ही मला झुकवण्याचे ,
  झुकेल मरणासमोरही अशी
  ह्या " शंभूची जात " नाही !
  _ जगदंब जगदंब !

  जात : स्वराज्य
  धर्म : स्वराज्य !

 • sagar_09 20w

  मेल्यावर देह जळेल ही पण ,
  जीवंतपणीच आत्मा जळतोय त्याच काय ?
  ©sagar_09

 • sagar_09 20w

  ये मोकळया हवेत तू ,
  घे तुला... कवेत तू ।
  ©sagar_09

 • sagar_09 23w

  #sgr09 जुनीच रचना .

  Read More

  जखम !

  " जखम बोलते जखमेशी
  आज तु भरू नको ,
  खपली काढून वाह जराशी
  आतल्याआत मरू नको !

  कित्येक दिवस होतीस मुकी
  आज मौन धरू नको ,
  वाचा फोडून मार गिरकी
  पाहून कोणाला कचरू नको !

  पुन्हा पुन्हा त्याच चुका
  आता तु करू नको ,
  सहजासहजी नाही सुटका
  लढण्याआधीच हरू नको !

  जखम बोलते जखमेशी
  आज तु भरू नको ,
  खपली काढून वाह जराशी
  आतल्याआत मरू नको ! "
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 97w

  #sgr09

  क्षणभंगुर !

  शब्द कशाला माणसाचा
  मी अपुला कुत्रा पाळतो ,
  थेंब हवा कुणा पावसाचा
  मी अपुला अश्रू ढाळतो !

  फुलं कशा देवा चढवू
  मी माझा जीव माळतो ,
  तेल फुका पणतीत ठेवू
  मी माझा मला जाळतो !

  वर्षा कामाची देह भिजला
  आत्मा उगा एकटा वाळतो ,
  काळ कधीचा दारी आला
  आत्मा उगा वेळ टाळतो !

  चाळण झाली पुरती माझी
  तरी अजूनही व्यर्थ चाळतो ,
  निजली निवांत काया माझी
  तरी अजूनही रक्त गाळतो !
  ©अज्ञातवासी

  Read More

  .

 • sagar_09 98w

  वरात दे !

  सोयीनुसार सदैव साथ दे
  मरणोत्तर सोडून कात दे !

  जमेल तेव्हा हसून पाहा
  खुशाल दुःखाला दात दे !

  घिरट्या मार तुटून पड
  समोरासमोर ती मात दे !

  जप रे नशिबाच्या ओव्या
  अखेरीस कर्माला हात दे !

  चालू राहूदे मुखवटे डाव
  पाठोपाठ सदैव घात दे !

  किरणे बिछाना नव्हे ऊन
  उशाशी स्वप्नांची रात दे !

  जरूर नाचेल मीही तेव्हा
  एक शेवटची वरात दे !
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 117w

  #sgr09

  अज्ञानी - ज्ञानी - आत्मज्ञानी - सदगुरू कृपे !

  Read More

  अज्ञानी !

  मावळला सुर्य
  संगतीला चंद्र
  तरी का हा जीव
  अज्ञानी अंधारात !

  काळोखाचा वारा
  भयाचा सुगंध
  मानवी हा देह
  भ्याड नपुंसक !

  किती काय बोला
  किती काय सांगा
  करी खरे स्वतःचे
  कोटीचा हो मूढ !

  चाले वेडेवाकुडे
  करी दुःखाशी सलगी
  सोयीनुसार करी
  आपली सोयरे निश्चित !

  भाग्य म्हणे माझे
  कर्म न तो करी
  रिताच तो राही
  विना आत्मज्ञानी !
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 117w

  येण्याने तिच्या !

  नकळत होऊन जाते
  नाते नवेच बनू लागते ,
  ओठांवरती आपल्या मग
  हसू नवेच खुलू लागते !

  सारे जग आपणास
  निराळेच भासू लागते ,
  येण्याने कोणाच्या
  आपले जीवनच बदलू लागते !

  आरश्याशी आपली मैत्री
  हल्ली घट्ट होऊ लागते ,
  काव्यमय सारेच मग
  आपणास वाटू लागते !

  मुकपणेच संवाद साधणे
  आपणासही जमू लागते ,
  येण्याने कोणाच्या
  आपले जीवनच बदलू लागते !

  रंगहीन चित्रही आपणास
  रंगीत ते दिसू लागते ,
  कोमजलेले ते फुलही
  पुन्हा नव्याने उमलू लागते !

  अवकाशापरी जीवनात आपल्या
  नवीच चांदणी चमकू लागते ,
  येण्याने तिच्या
  आपले जीवनच बदलू लागते !
  ©अज्ञातवासी


  #sgr09

  Read More

  ।। येण्याने तिच्या ।।
  ( मथळा पाहा )
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 117w

  " विसावा ! "

  नऊ महिन्यांच्या शोधानंतर
  अस्तित्वाचा सुगावा लागतो ,
  जन्मताच आपल्याला मग
  आवाज रडण्याचा करावा लागतो !

  पडत पडत , रांगत रांगत
  धडा जीवनाचा शिकावा लागतो ,
  काहीएक करण्याआधी
  चटका तव्याचा लागावा लागतो !

  पहिले पाऊल टाकण्यासाठी
  आधार भिंतीचा घ्यावा लागतो ,
  बोबडे बोल उच्चारण्यासाठी
  आवाज श्रीचा ऐकावा लागतो !

  एकदोन अन् बाराखडी सोबत
  घास गणिताचा खावा लागतो ,
  रडत रडत मग आपणास
  मार्ग शाळेचा धरावा लागतो !

  मित्र मैत्रिणी अन् शिक्षक
  आदर नात्यांचा राखावा लागतो ,
  हसत खेळत आपणास तो
  संवाद प्रेमाचा साधावा लागतो !

  होते कॉलेज मिळते डिग्री मग
  मांडव लग्नाचा उभारावा लागतो ,
  एकमेकांच्या मग सोबतीने
  रथ कुटुंबाचा ओढावा लागतो !

  असेच कायम दौडत राहून
  आवाज टापांचा करावा लागतो ,
  अंती मात्र आपणास हो
  श्वास अखेरचा मोजावा लागतो !

  गेल्यानंतर आपणास मग
  विधी स्वतःचा पाहावा लागतो
  सरण्यावरच्या ह्या प्रवासात
  आधार "विसाव्याचा" घ्यावा लागतो !
  ©अज्ञातवासी


  #sgr09

  Read More

  ।। विसावा ।।
  ( मथळा पाहा )
  ©अज्ञातवासी

 • sagar_09 117w

  भटकंती !

  वाट अंधारी , कोणास तारी
  लाट किनारी , सर्वांस मारी !

  रक्ताच्या गाठी , कडवट नाती
  पोकळ लाठी , होतेच माती !

  क्षणात इथे , क्षणात तिथे
  सर्वची रिते , सर्वची रिते !

  खोटा विचार , खोटा संसार
  देई हुंकार , देई हुंकार !

  चेहऱ्यावर मुखवटा , किती रंगछटा
  खालीची राहतो , आयुष्याचा ओटा !

  गारच वारा , आठवणींच्या गारा
  कुणाचा असतो , मनावर थारा !

  जायी हिंडावया , पाय बावळी
  नित्यची फसवे , मन चांडाळी !

  अवगुणी देह , सदगुणी कोण
  संत म्हणती , तुच ओळख !

  अंतरीच देव , तरी धडपड
  व्यर्थ भटकंती , तुझी वणवण !
  ©अज्ञातवासी